dr.satish best web design developer for mac

कडाल ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्यापासून 14 किलोमीटर अंतरावर वसलेलं माझं गाव कडाल. गावाच्या शेजारी हसूरवाडी, नौकुड, हिडदुग्गी, नरेवाडी, मुंगुरवाडी ही गावे आहेत. ग्रामपंचायतीची स्थापना 6 फेब्रुवारी 1958 साली झाली आहे. गावची लोकसंख्या 580 असून ती 3 वार्डात विभागली आहे. कडाल गावामध्ये ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत विविध कामाची अमलबजावणी होते. उदा. रस्ते दुरूस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गटार बाधणे, इ. कार्य करतात तसेच ग्रामपंचायतीने शासनाने राबविलेल्या वृक्षारोपण योजनेतून रस्‍त्‍याच्‍या दुर्तफा बाजुस झाडे लावलेली आहेत. ग्रामपंचायतीमार्फत झाडे संवर्धनासाठी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. गावाचे गावठाण क्षेत्र 13 हेक्टर्स, बागायत कृषी क्षेत्र 30 हेक्टर्स, तर जिरायती कृषी क्षेत्र 100 हेक्टर् इतके आहे. गावामध्ये दोन बोअर, दोन विहिरी आहेत. त्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या काही प्रमाणात कमी झाली आहे. गावाचे पोस्ट ऑफिस हसुरसासगिरी येथे आहे.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

कडाल ग्रामपंचायत ही सन 6 फेब्रुवारी 1958 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, आणि पाच सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अन्य कर्मचारी वर्ग ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस निर्मल ग्राम पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी मोफत वृक्षवाटप करून वृक्षलागवड करण्यात आली.

सरपंच
सौ. वर्षा मारुती पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. विकास बाबुराव पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. भुषण सुहास वरुटे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kadal Grampanchayat
A - Kadal, p - Hasursasgiri Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :

Office :